इंदापूर हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे तालुका मुख्यालय असलेले शहर आहे. हे शहर पूर्वी मोगल साम्राज्यात असताना शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे हे येथील शासक होते. त्यांच्या मृत्यूनंतर शहाजीराजांकडे हे शहर आले व नंतर शिवाजीराजांकडे गेले. राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या इंदापूरला पुण्याहून बसने जाता येते.