औसा हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. तालुक्याचे मुख्यालय या शहरात असल्याने राज्य सरकारची अनेक कार्यालये या शहरात आहेत. समुद्रसपाटीपासून ६३४ मीटर उंचीवर हे शहर वसलेले आहे. या शहराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. या शहरात मोठा जनावरांचा बाजार भरतो. संपूर्ण लातूर जिल्ह्यातून येथे गुरे विक्रीसाठी येतात.