पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर जेजुरी

जेजुरी हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, येथील खंडोबा मंदिर प्रसिद्ध आहे. पुण्यापासून ४८ कि.मी. अंतरावर जेजुरी आहे. येथे रेल्वेने किंवा बसने जाता येते. धनगर, कोळी व इतर अनेक समाजांचे कुलदैवत असलेल्या खंडोबाचे मंदिर इ.स. १६०८ मध्ये बांधण्यात आले. ३०० मीटर उंच डोंगरावर मुख्य मंदिर असून, किल्ला कोटा हे ठिकाण खाली आहे.