तळेगाव दाभाडे हे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. कृषी, औद्योगिक क्षेत्रांत काम करणाऱ्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये या शहरात असून, येथे मोठ्या प्रमाणात पोल्ट्री उद्योगही आहे. तळेगाव येथे अनेक तळी असल्यामुळेच पूर्वी याला ‘तळ्यांचे गाव’ असेही म्हटले जायचे. मुंबईपासून अवघ्या १३५ कि.मी.वर हे शहर वसलेले आहे.