पुणे जिल्ह्यातील छोटे शहर नीरा

नीरा हे पुणे जिल्ह्यातील छोटे शहर आहे. नीरा नदीच्या नावावरून या शहराचे नाव नीरा पडले असून, ते पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे. उजवा व डावा नीरा कालवा, तसेच नीरा नदी या शहरालगत वाहत असल्याने इथल्या लोकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. कोल्हापूर-पुणे रेल्वेलाईनवरील हे एक महत्त्वाचे स्थानक आहे.