एक महत्त्वाचे शहर मलकापूर (जिल्हा बुलढाणा)

मलकापूर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, त्याला ‘विदर्भाचे प्रवेशद्वार’ असेही म्हणतात. हे शहर विदर्भातील शैक्षणिक तसेच औद्योगिक क्षेत्राचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. ते कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर वसलेले आहे, या शहरापासून अगदी जवळच रेल्वे जंक्शन असून, हावड्याकडे जाणाऱ्या अनेक गाड्या येथे थांबतात.