माळशिरस हे सोलापूर जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, येथे अजूनही ग्रामपंचायत आहे. माळशिरस तालुक्याचे मुख्यालय या शहरात असल्याने पंचायत समितीसह अनेक सरकारी कार्यालये येथे आहेत. पुणे-पंढरपूर मार्गावर वसलेल्या या शहरात पुण्याहून एस.टी.ने जाता येते. दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम या शहरात असतो. त्यावेळी हजारो भाविक दर्शनासाठी येतात.