No Picture
Uncategorized

वाडेकर, देविदास दत्तात्रेय

कोशकार आणि तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले देविदास दत्तात्रेय वाडेकर यांचा जन्म २५ मे १९०२ साली सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात कुरोली या खेडेगावात झाला. त्यांचे वडील राहुरी येथे प्राथमिक शिक्षक होते. त्यामुळे प्राथमिक शिक्षण राहुरी येथे तर नगर येथे देविदास वाडेकर यांचे माध्यमिक शिक्षण झाले. […]

No Picture
Uncategorized

रणजित रामचंद्र देसाई

कथालेखक, नाटककार म्हणून रणजित देसाई यांचा परिचय असला तरी एक उत्कृष्ट दर्जाचे कादंबरी लेखक म्हणूनच महाराष्ट्राला भावलेले व्यक्तिमत्त्व. ८ एप्रिल १९२८ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाड हे आहे. माध्यमिक शाळेत असतानाच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. […]

No Picture
Uncategorized

गोळे, पद्मावती विष्णू

प्रेमभावने बरोबरच स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांचे प्रतिबिंब ज्यांच्या कवितेत दिसते त्या पद्मावती विष्णू गोळे या प्रसिद्ध कवयित्री होत्या. १० जुलै १९१३ मध्ये त्यांचा पटवर्धन घराण्यात जन्म झाला. एम. ए. पर्यन्त शिक्षण झाल्यावर त्या पुण्यालाच वास्तव्यास होत्या. ‘प्रीति प्रथावर’ हा १९४७ मध्ये त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. […]

No Picture
Uncategorized

विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज)

एखाद्या गावाची ओळख त्या गावाच्या ग्रामदेवतेवरून होते. तसेच एखाद्या व्यक्तिमत्त्वामुळे गावाचे श्रेष्ठत्व वाढते. नाशिकला लाभलेले असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज. […]

No Picture
Uncategorized

भागवत, दुर्गा नारायण

एक विदुषी, तसेच लोकसाहित्य, बौद्ध वाङ्मय, समाजशास्त्र इ. विषयांच्या अभ्यासक आणि ललित लेखिका म्हणून अधिकाराने ज्यांचे नाव घेतले जाते त्या दुर्गा भागवत हे महाराष्ट्राला परिचित असेच नाव आहे. दुर्गाबाईंचा जन्म १० फेब्रुवारी १९१० रोजी इंदूर येथे झाला. […]

No Picture
Uncategorized

दरेकर, गोविंद त्र्यंबक (कवी गोविंद)

अभिनव भारत या क्रांतिकारक संस्थेच्या कार्यात सावरकरांना जे सहकारी मिळाले त्यात आणि पुढील काळात सावरकरांनी ज्यांना ‘स्वातंत्र्यशाहीर’ या बिरूदाने गौरविले ते म्हणजे कवी गोविद त्र्यंबक दरेकर. स्वातंत्र्यपूर्व काळात देशाचे स्वातंत्र्य हा विषय केंद्रीभूत मानून काव्य करणे, स्वातंत्र्य प्रेमाची सुक्ते आणि वीरतेची सुभाषिते गाणारे कवी गोविद यांचा उल्लेख स्वातंत्र्य शाहरी म्हणून यथार्थ वाटतो. […]

No Picture
Uncategorized

बापट, गोविद शंकर

भाषांतरकार, संस्कृतचे व्यासंगी पंडित म्हणून त्या काळात प्रसिद्ध असलेले गोविद शंकर बापट यांचा जन्म ८ फेब्रुवारी १८४४ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे झाला. त्यांचे वडील हे व्युत्पन्नशास्त्री होते. […]

No Picture
Uncategorized

विनायक दामोदर सावरकर (स्वातंत्र्यवीर सावरकर)

उत्कट देशभक्त, जहाल क्रांतीकारक, तेजस्वी लेखक, कुसुमकोमल कवी, नाटककार, इतिहासकार, प्रभावी वक्ता, क्रियाशील समाजसुधारक असा एक माणूस या पृथ्वीतलावर होता. हे कुणाला खरे वाटणार नाही इतका स्वा. वीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे इंद्रधनुष्यासारखा शोभिवंत चमत्कार होता. […]