No Picture
Uncategorized

डहाके, वसंत आबाजी

कादंबरीकार, कवी आणि समीक्षक असलेले वसंत आबाजी डहाके हे सर्व महाराष्ट्राला साहित्यिक म्हणून परिचयाचे असले तरी एक वेगळा छंद त्यांनी आयुष्यभर जपला आणि तो म्हणजे चित्रकलेचा ! वसंत आबाजी डहाके यांचा जन्म विदर्भातला. यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा येथे ३० मार्च १९४२ रोजी त्यांचा जन्म झाला. […]

No Picture
Uncategorized

सई परांजपे

नाटककार, लेखिका आणि उत्कृष्ट नाट्यसिने दिग्दर्शिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या सई परांजपे यांची अजून एक महत्त्वाची ओळख म्हणजे बालसाहित्य लेखिका. एक वेळ प्रौढ साहित्य लिहिणे हे सहज शक्य असते मात्र बालसाहित्य हे तेवढेच अवघड काम. परंतु सई परांजपे हे अवघड काम आपल्या लेखणीद्वारे सहजतेने करून जातात आणि ते सहज असतं म्हणूनच सुंदर होतं. […]

No Picture
Uncategorized

कालेलकर, मधुसूदन

नाटककार, कथाकार आणि पटकथाकार म्हणून सर्वांना परिचित असलेलं नाव म्हणजे मधुसूदन कालेलकर. कालेलकरांचा जन्म २२ मार्च १९२४ रोजी झाला. त्यांचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण वेंगुर्ले या गावी झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईत वास्तव्य केले. साहित्य हा त्यचा आवडता विषय होता तर नाटकाविषयी प्रेम होते. ‘अखेर जमलं’ या मराठी चित्रपटासाठी त्यांनी विनोदी कथा लिहिली आणि तो चित्रपट चांगलाच गाजला. […]

No Picture
Uncategorized

भावे, पुष्पा

एक विचारवंत लेखिका, नाटक आणि रंगभूमी विषयी भरपूर लेखन आणि टीकात्मक समीक्षा करणार्‍या लेखिका म्हणून पुष्पा भावे ओळखल्या जातात. पुष्पा भावे यांचा जन्म २६ मार्च १९३९ सालचा. पूर्वाश्रमीच्या त्या सरकार घराण्यातील. उत्कृष्ट लेखनाबरोबर त्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ही प्रसिद्ध आहेत. […]

No Picture
Uncategorized

वाडेकर, देविदास दत्तात्रेय

कोशकार आणि तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले देविदास दत्तात्रेय वाडेकर यांचा जन्म २५ मे १९०२ साली सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात कुरोली या खेडेगावात झाला. त्यांचे वडील राहुरी येथे प्राथमिक शिक्षक होते. त्यामुळे प्राथमिक शिक्षण राहुरी येथे तर नगर येथे देविदास वाडेकर यांचे माध्यमिक शिक्षण झाले. […]

No Picture
Uncategorized

रणजित रामचंद्र देसाई

कथालेखक, नाटककार म्हणून रणजित देसाई यांचा परिचय असला तरी एक उत्कृष्ट दर्जाचे कादंबरी लेखक म्हणूनच महाराष्ट्राला भावलेले व्यक्तिमत्त्व. ८ एप्रिल १९२८ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाड हे आहे. माध्यमिक शाळेत असतानाच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. […]

No Picture
Uncategorized

गोळे, पद्मावती विष्णू

प्रेमभावने बरोबरच स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांचे प्रतिबिंब ज्यांच्या कवितेत दिसते त्या पद्मावती विष्णू गोळे या प्रसिद्ध कवयित्री होत्या. १० जुलै १९१३ मध्ये त्यांचा पटवर्धन घराण्यात जन्म झाला. एम. ए. पर्यन्त शिक्षण झाल्यावर त्या पुण्यालाच वास्तव्यास होत्या. ‘प्रीति प्रथावर’ हा १९४७ मध्ये त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. […]

No Picture
Uncategorized

विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज)

एखाद्या गावाची ओळख त्या गावाच्या ग्रामदेवतेवरून होते. तसेच एखाद्या व्यक्तिमत्त्वामुळे गावाचे श्रेष्ठत्व वाढते. नाशिकला लाभलेले असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज. […]