अंबाळे, नितीन
नितीन अंबाळे हा 28 वर्षीय तरूण, मराठी रंगभुमिवरील विवीध प्रकारांना स्पर्श करून आलेला अष्टपैलु कलाकार आहे. दिग्दर्शन, स्क्रीन प्ले, अभिनय, कथालेखन, संहितालेखन अशा सर्व प्रकारामध्ये त्याने असामान्य कौशल्य व अनुभव प्राप्त केला आहे. […]
नितीन अंबाळे हा 28 वर्षीय तरूण, मराठी रंगभुमिवरील विवीध प्रकारांना स्पर्श करून आलेला अष्टपैलु कलाकार आहे. दिग्दर्शन, स्क्रीन प्ले, अभिनय, कथालेखन, संहितालेखन अशा सर्व प्रकारामध्ये त्याने असामान्य कौशल्य व अनुभव प्राप्त केला आहे. […]
प्राध्यापक बापुराव जगताप हे प्रख्यात नामांतरवादी नेते, लेखक, व निळ्या पहाडीवरच्या कवितांचे जनक असे अष्टपैलु व्यक्तिमत्व होते. आंबेडकरांचे कट्टर अनुयायी व गाढे आभ्यासक असलेले जगताप हे अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्या तत्वप्रणालीशी एकनिष्ठ राहिले. औरंगाबाद येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातून प्रा. बापुराव जगताप हे मराठी विभागप्रमुख म्हणून 2001 साली निवृत्त झाले होते.
[…]
संदीप अवचट हे नामांकित व विश्वासार्ह मानले जाणारे प्रसिध्द ज्योतिषी, व प्राचीन ज्योतिर्विद्या तसेच अर्वाचीन अंकशास्त्राचे गाढे आभ्यासक व चिकीत्सक आहेत. […]
अद्वैत दादरकर हा मुंबईमधील रहिवासी असून मराठी प्रायोगिक रंगभुमीच्या प्रसारासाठी व प्रचारासाठी त्याने लिहीलेली अनेक दर्जेदार नाटके व बसविलेले एकपात्री अभिनयाचे खेळ आज महाराष्ट्राच्या संवेदनशील प्रेक्षकाच्या मनाला चांगलेच भिडले आहेत. […]
भालचंद्र उर्फ बी. जी. देशमुखांची गणती भारताच्या राजकीय पटलावरील सर्वपरिचीत व अनुभवी व्यक्तिमत्वांमधल्या, रूबाबदार व तडफदार अधिकार्यांमध्ये होते. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये त्यांनी भारतातील राजकीय वळणांची वाटचाल जवळून पाहिली होती, व राजकीयदृष्ट्या ऐतिहासिक असलेल्या एका कालखंडाचे ते प्रत्यक्ष साक्षीदार देखील होते. 1951 मध्ये स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले बी. जी देशमुख हे मुंबई राज्यातील पहिले आय. ए. एस. अधिकारी होते.
[…]
ज्यांच्या नावाने पुण्याचा संगीत महोत्सव अवघ्या भारतात नव्हे तर अवघ्या जगभरात गाजतो आहे व त्या महोत्सवात आपल्या गायनाची गुरूंची व घराण्याची गायकी गायला मिळावी म्हणून काही नवीन कलाकार कसोशीने प्रयत्न व प्रयास करत असतात. तसेच काही जेष्ठ व श्रेष्ठ गायक आणि वादक नेहमी हजेरी लावत असतात व त्यांच्या गायन वादनाने मंत्रमुग्ध होण्यासाठी सगळेच कानसेन त्या महोत्सवाची आतूरतेने वाट बघत असतात असा सवाई गंधर्व महोत्सव जो दर वर्षी पुण्यात न चुकता होतो व ज्याच्यां नावाने होतो ते सवाई गंधर्व उर्फ रामचंद्र गणेश कुंदगोळकर. […]
स्व.मोगूबाई कुर्डीकरांचा जन्म १४ जुलै १९०४ रोजी गोव्यातील कुर्डी गावात झाला. लहानपणापासूनच घरातील संस्कार व आई जयश्रीबाई यांची शास्त्रीय गाण्याची तळमळ मोगूबाईंना गानतपस्विनी होऊनच शांत झाली असेल. […]
निशीकांत कामत हा आजच्या तरूण पिढीचा दबलेला आवाज चित्रपटांद्वारे सगळ्यांपुढे मांडणारा एक नव्या व ताज्या दमाचा दिग्दर्शक. नव्या पिढीच्या आकांक्षाचं, स्वप्नांचं, व अपेक्षांचं प्रतिनिधीत्व करणारे असे त्याचे चित्रपट आजच्या दिग्दर्शकांच्या विशिष्ठ साच्यापेक्षा खुप वेगळे व आशयपुर्ण असतात. प्रेक्षकांच तीन तास निव्वळ मनोरंजन करण्यापेक्षा त्यांना विचार करायला लावतील व समाजात वावरणार्या अपप्रवृत्तींविरोधात आवाज उठवायला लावतील असे चित्रपट बनवण्याकडे त्याचा कल असतो व त्याची ही वेगळी तर्हा व शैली प्रेक्षकांनी चांगलीच उचलून धरली आहे.
[…]
मुद्रण तंत्रज्ञानात मौलिक संशोधन करणारे अमेरिकानिवासी भारतीय संशोधक. भिसे टाइप मुद्रण यंत्र, सिंगल टाइपकास्टर विथ युनिव्हर्सल मोल्ड, रोटरी मल्टिपल टाइपकास्टर या यंत्रांचा, अॅटोमायडीन या औषधाचा व विद्युत्शास्त्र वगैरेतील एकूण २०० शोधांचे जनक. त्यांना ४० शोधांची एकस्वे मिळाली.
[…]
प्रदीप वसंत नाईक हे भारताचे एकोणीसावे वायुदल प्रमुख होते. अनेक सैनिकी कारवायांमध्ये व अतिरेक्यांच्या शोध मोहिमांमध्ये असाधारण अस शौर्य गाजवून आपल्या तिरंग्याची किर्ती अबाधीत राखल्यानंतर ते या सर्वोच्च पदावर आरूढ झाले. ही सर्व मराठी माणसांसाठी निश्चितच गौरवाची बाब आहे. […]
Copyright © 2026 | MH Magazine WordPress Theme by MH Themes