No Picture
Uncategorized

छोटा गंधर्व (सौदागर नागनाथ गोरे)

गायक म्हणून छोटा गंधर्व यांनी आपल्या नाट्यपदां मधुन विविधभावपूर्णता दाखवून दिली; त्यांचा लोकप्रिय नाट्यपदांपैकी ” आनंदे नटती”, “कोण तुजसंग सांग गुरुराया” “चंद्रिका ही जणू” , “चांद माझा हा हासरा”, “छळि जीवा दैवगती”, “तू माझी माउली”, “दिलरुबा दिलाचा हा”, “दे हाता शरणागता”, “नच सुंदरी करु कोपा”, “प्रिये पहा रात्रीचा समय सरुनि”, “बघुनी वाटे त्या नील पयोदाते”, “बहुत दिन नच भेटलो”, “माता दिसली समरी विहरत”, “या नव नवल नयनोत्सवा”, “रजनिनाथ हा नभी उगवला” या नाटकांचा समावेश आहे.
[…]

No Picture
Uncategorized

आपटे, विनय

अभिनेते विनय आपटेंचा जन्म १७ जून १९५१ साली झाला. विद्यार्थी दशेत विद्यार्थी संघटनांसाठी काम करता करता त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले ते विजय बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली. राज्य नाट्य स्पर्धेत विनयजींनी ‘मेन विदाऊट शॉडो’ हे नाटक केले. या नाटकासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. त्यानंतर त्यांनी लागोपाठ तीन वर्षे राज्य नाट्य स्पर्धेत दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळवून हॅटट्रिक केली. […]

No Picture
Uncategorized

पाटील, राजीव

आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून पाटील यांनी गावरान विषय, सामाजिक प्रश्न तसंच वास्तवता मांडली. ‘सावरखेड-एक गाव’ , ‘जोगवा’, ‘७२ मैल एक प्रवास’, ‘पांगिरा’, ‘सनई चौघडे’, ‘ऑक्सिजन’, ‘ब्लाईंड गेम’; असे वैविध्यपूर्ण विषय दिग्दर्शित करुन प्रेषकाचं पुरेपूर मनोरंजन होईल याची खात्री घेतली.
[…]

No Picture
Uncategorized

सुरकर, संजय

मूळचे नागपूरचे असलेले संजय सुरकर यांचा जन्म १९ ऑगस्ट १९५९ रोजी झाला. राज्य नाट्य स्पर्धेत त्यांच्या अनेक एकांकिका गाजल्या. संजय सुरकर यांना अभिनेता व्हायचं होत कारण स्पर्धांमधील अनेक एकांकिकांमध्ये दिग्दर्शनाबरोबरच त्यांनी अभिनयही केला होता. ‘वंश’ ही सुरकर आणि मंगेश कदम यांनी एकत्रित दिग्दर्शित केलेली एकांकिका राज्य नाट्य स्पर्धेत पहिली आली होती.
[…]

No Picture
Uncategorized

बेर्डे, लक्ष्मीकांत

लक्ष्मीकांत बेर्डे हे हे मराठी रंगभूमी व चित्रपट तसंच हिंदी चित्रपटांमधील एक प्रसिद्ध विनोदी अभिनेता होय, त्यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९५४ ला झाला.लहानपणापासूनच लक्ष्मीजींना विविध कलांची आणि अभिनयाची आवड असल्यामुळे गणेशोत्सवात व इतर सार्वजनिक कार्यक्रमा व महाविद्यालयीन महोत्सवांमध्ये भाग घेत आणि त्यामध्ये अनेकवेळा पारितोषिके पटकावली होती.
[…]

No Picture
Uncategorized

शिरोडकर, शिल्पा

बॉलिवूडमध्ये शिल्पाला शिरोडकर यांची बोल्ड अभिनेत्री म्हणून ख्याती होती. यूकेत स्थायिक व व्यवसायाने बँकर असणार्‍या अप्रेशरंजीत या व्यक्ती सोबत ११ जुलै २००० यादिवशी मुंबईत विवाहबध्द झाली .लग्नानंतर शिल्पा यूकेत स्थायिक झाली. २००३ मध्ये शिल्पाने मुलीला जन्म दिला. तिचे नाव अनुष्का असून शिल्पा तिच्या संगोपनात बिझी झाली.
[…]

No Picture
Uncategorized

शिरोडकर, नम्रता

नम्रता शिरोडकरने १९९८ साली “जब प्यार किसी से होता है”, या चित्रपटातील एका छोट्याश्या भुमिकेतून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्याशिवाय ‘मेरे दो अनमोल रतन’, ‘हीरो हिन्दुस्तानी’, ‘कच्चे धागे’, ‘वास्तव’, ‘आगाज़’, ‘हेरा फेरी’, ‘अस्तित्व’, ‘पुकार’, ‘अलबेला’, ‘तेरा मेरा साथ रहे’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘मसीहा’, ‘तहज़ीब’, ‘रोक सको तो रोक लो’, ‘चरस’, ‘ब्राइड एंड प्रीजुडिस’; यासह अनेक भारतीय चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत […]

No Picture
Uncategorized

लिमये, उपेंद्र

मराठी रंगभूमी, चित्रपट, मालिका तसंच हिंदी सिनेसृष्टीतील गुणी कलावंत म्हणून उपेंद्र लिमये हे नाव आपल्याला परिचित आहे. ८ मार्च १९७४ रोजी पुणे येथे जन्मलेल्या उपेंद्र लिमयेंना लहानपणापासूनच अभिनयकलेची आवड होती. १९८७ साली पुण्याच्या ललित कला केंद्रातून अभिनयाचं सास्त्रोक्त प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल झाले.
[…]

No Picture
Uncategorized

शिलेदार, जयमाला

२१ ऑगस्ट १९२६ साली पेण येथे जन्मलेल्या जयमालाबाईंचं माहेरचं नाव प्रमिला जाधव होतं. त्यांचे वडील नारायणराव जाधव हे मुंबईत वास्तव्यास होते.पण मुंबईच्या गोदीला आग लागल्यानंतर अनेक कुटुंबांनी मुंबई सोडून अन्यत्र स्थलांतर केले, त्यावेळी जाधव यांनीही आपल्या कुटुंबासह बेळगावात स्थलांतर केले. मास्तर कृष्णराव , गोविंदराव टेंबे आणि गानसरस्वती मोगूबाई कुर्डीकर यांच्याकडे त्यांनी गायकीचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले.
[…]