Year: 2022
अच्युत पालव
१९८३ साली अच्युत पालव यांनी उल्का शिष्यवृत्तीसाठी मोडी लिपीचा पंधराव्या ते सतराव्या शतकांतील इतिहास, तसेच मोडी लिपीची विविध वळणे व अक्षररुपे यांवर कलात्मक दृष्ट्या संशोधन करुन प्रबंध लिहिला. मोडी व आजची देवनागरी यांच्या दृश्य समन्वयातून ‘धृतनागरी’ तयार केली. तिला ‘मुक्त लिपी’ असे नाव दिले. या लिपीचा त्यांनी सुलेखनातून कलात्मक आविष्कार घडवून ह्या प्रयोगाची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख करुन दिली. […]
कमलाकर सारंग
विजय तेंडुलकर लिखित ‘सखाराम बाइंडर हे नाटक प्रचंड वादग्रस्त व वादळी ठरले. या नाटकाविरुद्ध दिग्दर्शक कमलाकर सारंग यांना लढा द्यावा लागला. नाटकाविरुद्ध खटला भरला गेला. हे नाटक म्हणजे ‘विवाह संस्था’ संकटात सापडण्याचे भय आहे, असा आक्षेप घेण्यात आला होता. सहा महिने लढल्यावर नाटक एकही कट न करता हायकोर्टातून सुटलं आणि पुन्हा दिमाखानं प्रयोग सुरू झाले. […]
उषा मंगेशकर
ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांचा संगीत प्रवास अलौकिक असाच आहे. उषाताई मंगेशकर यांना खरी प्रसिद्धी मिळाली ते जय संतोषी माँ या चित्रपटातील काही गाण्यांनंतर मे तो आरती उतारु रे या गाण्यांसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट स्त्री गायिका पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले. नंतर त्यांचे मुंगळा हे गाणे व पिंजरा या चित्रपटातील गाणी तर लोकांच्या मनात अजून ही घर करून आहेत. […]
गायिका डॉ. वीणा सहस्रबुद्धे
ख्याल गायिकी आणि भजनगायनासाठी त्या ओळखल्या जात होत्या. संगीताबरोबरच संस्कृत आणि इंग्रजीतील पदवीही कानपूर विद्यापीठातून प्राप्त केली होती. त्यानंतर ‘संगीत अलंकार’ ही पदवी मिळविली होती. […]
गायिका डॉ. रेवा नातू
मुळच्या पुण्यातील असलेल्या डॉ.रेवा नातू यांचे वडील पं. विनायक फाटक हे प्रसिद्ध तबलावादक असल्याने त्यांचे संगीत शिक्षण घरातूनच झाले. दत्तोपंत आगाशे, पं. शरद गोखले आणि डॉ. दिग्विजय वैद्य यांच्या कडून त्यांनी संगीताचे शिक्षण केले. त्यांनी […]
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे
ढेरे यांच्या लेखनाचा प्रारंभ झाला तो साधारण १९४८ मध्ये, वयाच्या अठराव्या वर्षी कवितेतून. पुढे दोनच वर्षांत, १९५० मध्ये त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरील पुस्तिका प्रकाशित केली. […]
कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम
१९६१ साली ते पुण्यात आले आणि एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स करुन, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले. त्यावेळी पुणे विद्यापीठातून त्यांनी कायद्यात बॅचलर डिग्री मिळवली आणि पुढे पुणे विद्यापीठातून मास्टरचेही शिक्षण पूर्ण केले. १९६४ मध्ये अवघ्या २० वर्षाच्या वयात त्यांनी ‘भारती विद्यापीठ’ ही शैक्षणिक संस्था स्थापन केली. […]
समाजसेवक, राजकीय नेते डॉ.पंजाबराव देशमुख
पाश्चात्य संस्कृती, शिष्टाचार, चालीरीती व सभ्यता याचे सूक्ष्म अवलोकन केले. २१ ऑगस्ट १९२० रोजी पंजाबराव एस. मलोत्रा यांच्या बोटीने ७ सप्टेंबर १९२० ला इंग्लंडला पोचले. अत्यंत खडतर जीवन जगत पंजाबरावांनी अभ्यास करून उच्च विद्याविभुषीत होउन डॉ.पंजाबराव १५ जुलै १९२६ रोजी मुंबई गेट वे ऑफ ईंडीयावर उतरले. […]
डॉ. डी. वाय. पाटील (डॉ.ज्ञानदेव यशवंतराव पाटील)
१९५७ ते १९६२ या काळात डॉ. डी. वाय. पाटील हे काँग्रेसकडून कोल्हापूरचे महापौर होते. १९६७ आणि १९७२ साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत आमदार म्हणूनही निवडून गेले होते. […]