बेडेकर (डॉ.) वासुदेव ना

ठाण्याच्या विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक असलेले डॉ. वा. ना. बेडेकर हे ठाणे शहराचे एक भूषण होते. त्यांच्याच प्रेरणेने ठाणे भारत सहकारी बॅंकेची स्थापना झाली. ठाण्यातील अनेक सामाजिक संस्था तसेच सामाजिक चळवळींशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता.