नातू, (डॉ.) उल्का अजित

शिकागो येथील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वतीने व्याख्यानासाठी निमंत्रित आणि तिथेच विशेष आंतरराष्ट्रीय स्तरावर ठाण्याचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरणार्‍या आणि समस्त ठाणेकरांना अभिमान वाटणार्‍या डॉ. उल्का नातू यांनी आपल्या क्षेत्रातील योगदानामुळे ठाण्याच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे रोवले आहेत. मूळातच एम.डी. असलेल्या डॉ. उल्का यांनी योग शिक्षण पदविका प्राप्त करुन गेली दहा वर्षं त्या योगचार्य श्रीकृष्ण व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

ठाणे येथील स्वत:च्या रुग्णालयात गेली अनेक वर्षे त्या कार्यरत आहेत. घंटाळी मित्रमंडळ संचालित निरंजन योग स्वास्थ्यकेंद्रात सल्लागार म्हणूनही त्या कार्यरत आहेत. तसेच डॉ. नातू चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेली अनेक वर्षं नि:शुल्क योग मार्गदर्शनही त्या करत आहेत. तसेच अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये त्यांनी व्याख्याने दिली आहेत.

पुरस्कार : डॉ. उल्का नातू यांना आजवर “नवदुर्गा पुरस्कार”, “चित्पावन” ब्राम्हण संघ उत्कृष्ट समाजकर्ण पुरस्कार, रोटरी क्लब तर्फे Vocation Excellence Award अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.