सई परांजपे
नाटककार, लेखिका आणि उत्कृष्ट नाट्यसिने दिग्दर्शिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या सई परांजपे यांची अजून एक महत्त्वाची ओळख म्हणजे बालसाहित्य लेखिका. एक वेळ प्रौढ साहित्य लिहिणे हे सहज शक्य असते मात्र बालसाहित्य हे तेवढेच अवघड काम. परंतु सई परांजपे हे अवघड काम आपल्या लेखणीद्वारे सहजतेने करून जातात आणि ते सहज असतं म्हणूनच सुंदर होतं. […]