चिंच, खजुराची टिकाऊ चटणी

साहित्य:- अर्धी वाटी चिंच, शंभर ग्रॅम लाल बिनबियांचा खजूर, दीड वाटी गूळ, दीड मोठा चमचा तिखट (बडगी किंवा कश्मीरी ), एक मोठा चमचा धने,जिरेपूड, दोन मोठे चमचे रिफाइंड तेल, एक मोठा चमचा व्हिनेगर, चवीनुसार मीठ.

कृती:- चिंच आणि खजूर स्वतंत्रपणे धुऊन बेताच्या पाण्यात भिजत घालावेत. चिंच कोळून घेऊन चिंचेचा कोळ आणि खजूर एकत्र बारीक वाटावं.त्यात गूळ चिरून घालावा. जाड बुडाच्या भांडयात तेल तापवून त्यात धने:-जिरंपूड, तिखट आणि चिंच:-गुळाचं मिश्रण घालून उकळावं. चवीनुसार मीठ घालावं. मिश्रण घट्टसर झालं की, व्हिनेगर घालून चटणी उतरवावी. पूर्ण गार झाल्यावर बाटलीत भरावी . पंधरा,वीस दिवस चांगली राहते. दही वडा, कचोरीबरोबर ही चटणी देता येते, किंवा याच चटणीत पाणी घालून थोडी पातळ करून ओली भेळ करता येते.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३