कारंजा लाड हे वाशिम जिल्ह्यातील एक शहर आहे. संत कारंज यांच्या नावावरून या शहराचे हे नाव पडलेले आहे. नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मगाव असल्याने हे शहर देशभर एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. येथील ऋषी तलाव प्रेक्षणीय असून, येथील जुने शासक नवाब सुभान खान यांच्या राजवाड्यात सध्या पालिकेचे कार्यालय सुरू करण्यात आलेले आहे.