कोपरगाव हे अहमदनगर जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, शिर्डीपासून ते १४ किलोमीटरवर, तर मनमाड रेल्वे जंक्शनपासून ते ४० किलोमीटरवर वसलेले आहे. गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर समुद्रसपाटीपासून ४९३ मीटर उंचीवर आहे. २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६३ हजार आहे. येथील साईधाम विशेष प्रसिद्ध आहे.