वाशिम जिल्ह्यातील एक पवित्र धार्मिक शहर मंगुळपीर

मंगुळपीर हे वाशिम जिल्ह्यातील एक पवित्र धार्मिक शहर आहे. येथील पीर हजरत दादा हयात कलंदर यांचा दर्गा देशभर प्रसिद्ध आहे. तसेच येथे असणारे बिरबलनाथ महाराज यांचे मंदिरही प्रसिद्ध आहे. या मंदिराची व्यवस्था शहरातल्या ठाकूर परिवाराकडे आहे. प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. त्यासाठी राज्यभरातून भाविक येतात.