अहमदनगर जिल्ह्यातील एक जुने शहर श्रीगोंदा

श्रीगोंदा हे शहर अहमदनगर जिल्ह्यातील एक जुने शहर आहे. या शहराचा संतांची पुण्यभूमी असा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो. या शहराच्या परिसरात १२ शिवमंदिरे असून, या परिसरात आठ संत होऊन गेले. शेख मोहम्मद महाराज, कृष्णनाद केणे महाराज आणि संत नाना महाराज हे तीन थोर संत याच भूमीतले. वर्षभरात येथे अनेक यात्रा व सोहळे होतात.