पुणे शहर हे महाराष्ट्रातील महत्त्वाची औद्योगिक नगरी असुन माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा प्रमुख केंद्रबिंदू आहे. पुणे-मुंबई ही दोन महत्त्वाची शहरे जोडणार्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. त्याचसोबत भोसरी, चाकण, हिंजवडी, रांजणगाव, कुरकुंभ, बारामती, जेजुरी येथेही महत्त्वाच्या औद्योगिक वसाहती आहेत.