२९ ऑक्टोबर १९८३ मध्ये नाशिक तेथे जन्मलेल्या पियुष नाशिककर हे मराठी पत्रकारितेद्वारे मराठीचा प्रचार व प्रसार करण्याची सतत मनिषा बाळगणारा एक तरूण पत्रकार आहे. आधुनिक व इंग्रजी वातावरणात राहिलेला वाढलेला असला तरी मराठीशी त्याची असलेली नाळ अजुन तुटलेली नाही. लोकमत या नामांकित वृत्तपत्राच्या मुंबई आवृत्तीचा उपसंपादक म्हणून व दक्ष पत्रकार म्हणून त्याची ओळख सर्वपरिचीत आहे. श्री डाह्याभाई बिटको हायस्कुलमधुन त्याने नाशिक येथे शालेय शिक्षण घेतले. पुणे विद्यापीठ येथे पदवी शिक्षण घेत असताना अनेक चाकोरीबाहेरील कामे त्यानी केल्या आहेत.