घोसाळकर, दत्तात्रय

नाट्यक्षेत्रात एक नावाजलेला रत्न म्हणजे दत्तात्रय घोसाळकर होय. आतापर्यंत त्यांच्या दत्त विजय प्रॉडक्शनच्या माध्यमातून १७ नाटके त्यांनी निर्माण केली त्यात आईचं घर उन्हाचं, यदाकदाचित, देहभान, तनमन तुझ्याविना, रामनगरी सारखे वेगळे विषय त्यांनी हाताळले. ते एक उत्कृष्ट मराठी नाट्य निर्माते आहेत.

दत्तात्रय घोसाळकरांनी त्यांच्या संस्थेतर्फे ठाण्यातील अनेक लेखक, दिग्दर्शक, कलाकार यांना रंगमंचावर प्रथम आणण्याचा प्रयत्न केला.