अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत नाटकांचं युग सुरू करणारे रंगकर्मी म्हणजे अण्णासाहेब किर्लोस्कर. ‘संगीत सौभद्र’ आणि ‘संगीत शाकुंतल’ या त्याकाळी गाजलेल्या आणि त्यातील नाट्यगीतांमुळे आजही लोकप्रिय असलेल्या नाटकांचे नाटककार म्हणजेच अण्णासाहेब किर्लोस्कर. एका पारशी नाटकाचा प्रयोग त्यांनी पाहिला आणि असाच एखादा नाट्यप्रयोग मराठीत करून तो रंगभूमीवर आणायचा, असं त्यांनी ठरवलं. कथानक शोधता शोधता कालिदासांच्या ‘अभिज्ञान शाकुंतल’ या कलाकृतीने त्यांच्या मनात घर केलं. त्यातूनच ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाचा जन्म झाला. […]