साहित्य: १ वाटी वरपर्यंत भरून मिश्र कडधान्य (मूग, मटकी, काबुली चणे, मसूर, उडीद, चवळी आणि हिरवे वाटाणे) ३ ते ४ हिरव्या मिरच्या किंवा चवीनुसार १ चमचा जिरे १/४ वाटी तेल १/४ वाटी कोथिंबीर, बारीक चिरून चवीपुरते मीठ.
कृती: सर्व कडधान्ये एकत्र करून पाण्यात ८ ते १० तास भिजवावीत. कडधान्ये नीट भिजली की त्यातील न भिजलेली, कडक राहिलेली कडधान्ये वेचून काढून टाकावीत. स्वच्छ केलेली कडधान्ये कापडात बांधून मोड यायला उबदार जागी ठेवावी. ७ ते १० तासांनी मोड येतील. मोड आले की मिक्सरमध्ये कडधान्ये, मिरच्या, मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून किंचित भरडसर राहील असे फिरवावे. इडली पिठाएवढे घट्ट असावे. चिरलेली कोथिंबीर, जिरे आणि मीठ घालावे. नॉन-स्टिक तवा गरम करून त्यावर थोडेसे तेल घालावे. डावभर पीठ घालून ते जमेल तेवढे पातळ पसरवावे. आच मध्यम ठेवावी. झाकण ठेवून २-३ मिनिटे वाफ काढावी. नंतर झाकण काढून धिरडय़ाच्या कडेने तेल सोडावे. बाजू पालटून दुसरी बाजूही नीट शिजू द्यावी. टोमॅटो केचप किंवा आवडीचे तोंडी लावणे घेऊन गरमच खावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३