ओपन सॅन्डविच

साहित्य – ब्रेड, फ्रेश भाज्या, तेल, लाल तिखट मोहरी, मीठ.

कृती – ब्रेडची कड कापून घ्या. टोस्टारमध्ये ब्रेडचा टोस्ट करुन घ्या. आपल्याला आवडतील त्या फ्रेश भाज्या बारीक चिरून घ्या. त्यामध्ये फ्लॉवर, ढोबळी मिरची, कांदा, आवडत असल्यास बारीक चिरलेला पालक, बारीक चिरुन कांदा, कांदा पात आदी भाज्या चिरुन घ्या. आता एका कढईत तेल तापवून फोडणी करा त्यामध्ये या चिरलेल्या भाज्या घाला. त्यावर चवीनुसार मीठ आणि तिखट घाला. या भाज्या मंद आचेवर तीन ते चार मिनिट परतून घ्या. भाज्या टोस्टवर घालून खा.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३