रसगुल्ला

साहित्य – 1 लिटर दुध ( मलाई न काढता ), 300 ग्राम साखर, 2 लिंबाचा रस.

कृती – एक  स्वच्छ भांडे घेऊन त्यात दूध उकळून घ्यावे. जेवढा लिंबूचा रस आहे तेवढेच त्यात पाणी घाला  व लिंबाचा रस हळूहळू उकळत्या दुधात , दुध फाटे पर्यन्त टाका  आणि दुध हलवत रहा  जेव्हा दुध चांगल्या प्रकारे फाटेल  तेव्हा लिंबाचा रस टाकणे बंद करा  ,  ह्या  फाटलेले दुध एका सूती कपड्यात ओतून गाळून घ्या व ( तयार झालेल्या पनीरला ) कपड्यातच थंड पाण्याने धुवून घ्या जेणेकरून त्यातील आंबटपणा निघून जाईल.नंतर कपडा चारही बाजूंनी एकत्र गुंडाळून हाताने दाबून पाणी पूर्णपणे निथळून घ्यातयार झालेला गोळा एका ताटात काढा आणि हाताने  एकजीव  होईपर्यंत मळून घ्या व त्याचे लाडूसारखे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या.नंतर  एका पातेल्यात साखर व  4 कप पाणी टाका आणि उकळून घ्या, उकळी आल्यानंतर त्यात तयार केलेले गोळे एक एक करून सोडा.व पातेले झाकून ठेवा , 10 -15 मिनिट रसगुल्ले शिजवून घ्यातयार झालेले रसगुल्ले पाकासहित   एका भांड्यात काढून घ्या व थंड होऊ द्या, 5- 7 तासानंतर हे रसगुल्ले तुम्ही सर्व्ह करू शकता.